पुणे | सावरकरांचं नाव घेण्याची लायकी नसलेले लोक सुद्धा त्यांच्यावर टीका करतात, असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. सावरकर हे पहिले व्यक्ती आहे ज्यांना हिंदुत्व समजलं, संपूर्ण जग त्यांना ओळखतं, असं विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. सावरकर यांच्या जयंती दिवशी ते नायक की खलनायक यावर चर्चा होते. मुळात यावर चर्चा करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असं विक्रम गोखले म्हणाले. दरम्यान, सावरकर ही एकच व्यक्ती आहे ज्यांनी दलितांना जवळ करा असं सांगितलं, असं विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.
