मुंबई : मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेचे काम करताना शनिवारी एक दुर्घटना घडली. बोगद्याचे खोदकाम करताना एक मोठा दगड पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. तर एक मजूर जखमी झाला आहे. या घटनेत मजुराला रूग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा मजूर बोगद्याची खुदाई करत होते, त्यावेळी दगडाचा एक तुकडा तुटून बोगद्यात पडला. यावेळी दगड लागल्याने मजुराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. मुंबईमध्ये मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. मुंबई मेट्रो-३ च्या प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटीटी) ते मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान ३.८२ किलोमीटर लांबीचा बोगदा बनून तयार झाला आहे. या बोगद्याची निर्मिती हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनी (एचसीसी)ने केले आहे. एचसीसीने दररोज सरासरी ८.२० मीटर ड्रिलिंग करून ३.८२ किमी. लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण केले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरशन लिमिटेडने एचसीसीला जुलै २०१६ मध्ये याचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते.
