मुंबई : कॉटन ग्रीनजवळील स्कायवॉकला आग

0

मुंबई : कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाजवळच्या स्कायवॉकवर  आज सकाळी आग लागली. ही माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमनच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजलेली नाही. कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाला लागूनच स्कायवॉक आहे. लागलेल्या आगीत स्कायवॉकवरील छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे प्रयत्न करत होते. या दुर्घटनेत कुणीही जखमी किंवा जीवितहानी झालेले नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here