दिवाळी पार्श्वभूमीवर लहान-थोरांत उत्साहाचे वातावरण

0

रत्नागिरी : दिव्यांचा सण म्हणून ओळख असणाऱ्या दीपावलीचा आज पहिलाच दिवस. सर्वत्र दिव्यांची आरास, घरापुढे रांगोळी, दरवाज्याला गोंड्याचे तोरण लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. दिवाळी आनंदाचा आणि सौख्याचा सण. यंदाच्या दिवाळीत त्याच विचारांचे दिप उजळले आणि पारंपारिकतेला साजेसा दिपोत्सवाचा आंनद अवघ्या रत्नागिरीकरांनी लुटला. सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान आटोपल्यावर पहील्या पहाटेच्या चैतन्यासह सर्वांनी मनमुराद अनुभवला. फटाके फोडण्यासाठी लहानथोरांची लगबग सुरू झाली. घरादारावर आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची तोरणे झळकू लागली. पहाटेच दारासमोर रंगबिरंगी कंदील प्रकाशमान झाले. दारात पणत्यांची आणि रांगोळयांची आरास फुलुन आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 14-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here