गोंधळे येथे घरफोडी करून २५ हजारांची रोकड लंपास

0

चिपळूण : तालुक्यातील गोंधळे देऊळवाडी येथे अज्ञाताने घराचे दार तोडून घरातील २५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या बाबत सुनीता मधुकर गोंधळेकर (५८, रा. शिवाजीनगर, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री हा प्रकार घडला. अज्ञात चोरट्याने गोंधळेकर यांचे चुलत भाऊ नंदकुमार गोंधळेकर यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील कपाटामधील २५ हजारांची रक्कम लांबवली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 14-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here