पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते गोविंद राठोड यांचा सत्कार

0

खेड : जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबादारी’ मोहिमेंतर्गत ‘कुटुंबाची साथ-कोरोनावर मात’ या जिल्हास्तरीय फेसबुक लाईव्ह प्रश्नमंजुषा स्पर्धेत खेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गोविंद राठोड यांचा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोविंद राठोड हे खेडमध्ये श्रीमान चंदूलाल शेट हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक म्हणन कार्यरत आहेत. अनेक वर्षे ते वृत्तपत्रात देखील ते लिखाण करतात. या कार्यक्रमास पालकमंत्री अनिल परब, ना. उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, सीईओ डॉ. इंदुराणी जाखड, आ. राजन साळवी आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 14-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here