खो-खो मध्ये मसल्स आणि स्ट्रेंथला महत्व : डॉ. कश्मीरा सबनीस

0

रत्नागिरी : खो खो मध्ये मसल्स आणि स्ट्रेंथ हे महत्वाचे आहे. त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पुरक व्यायामप्रकार केले पाहीजेत. नियोजनबध्द कसरती केल्या तर खो-खो खेळाडूची ताकद वाढेल, अशी माहिती डॉ. कश्मीरा सबनीस यांनी दिली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे आधारस्तंभ खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र खो-खो संघटनेने खो-खो प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. दुसर्‍या आठवड्यातील पहिल्या सत्रामध्ये शनिवारी (ता. 14) डॉ. सबनीस यांनी मसल्स आणि स्ट्रेंथ याबाबत प्रात्यक्षिकांसह महत्त्वपूर्ण माहीती दिली. या सत्राच्या आरंभी खो-खो महासंघाच्या उपाध्यक्ष राणी तिवारी आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कार्यशाळेला उपस्थित राहून या उपक्रमाचे अभिनंदन केले. डॉ. सबनीस म्हणाल्या की खेळाडूला खो-खोसाठी पूरक ताकद वाढवायची असेल तर आठवड्याचे नियोजन केले पाहीजे. त्यात वेग, ताकद आणि लवचिकता वाढविण्यासाठी आवश्यक व्यायाम प्रकार किती दिवस करायचे यावर भर दिला पाहीजे. हे करत असताना व्यायाम प्रकारात बदल असणे आवश्यक आहे. स्ट्रेंथ प्रशिक्षणात आठवड्यातून तिनवेळा स्कॉट करायलाच पाहीजे. भविष्यात त्यामध्ये वाढ करता येते. पॉवर आणि अ‍ॅज्युलिटी आठवडयातून दोनवेळा झालेच पाहीजे. हे नियोजन केले तर निश्‍चितच खेळाडूची तादक वाढण्यास मदत होईल. ताकद वाढविण्याच्या प्रशिक्षणानंतर धावण्याची गरज नाही. एखाद्या प्रकारासाठी आवश्यक कसरती केल्यानंतर थोडी विश्रांत आवश्यक आहे. तसे केले तर शरीर मजबूत होते. नियोजन करताना यावर प्रशिक्षकांनी लक्ष केंद्रीत केले पाहीजे. ऑनलाईन कार्यशाळेचा कार्यक्रम राज्य खो-खो संघटनेचे अध्यख संजीवराजे नाईक निंबाळकर, खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोल, सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या सत्राची प्रस्तावना डॉ. प्रशांत इनामदार तर आभार संतोष सावंत यांनी मानले. यासाठी समन्वयक म्हणून राजेंद्र साप्ते तर शिरीष मोरे, सुशील इंगोले यांनी मेहनत घेतली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here