रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘सहकार भूषण’ पुरस्काराने गौरव

0

रत्नागिरी : उत्कृष्ट कामगिरीसाठी शासनाकडून सहकारी बँकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी सहकार भूषण पुरस्कार देऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गौरव शासनाने केला आहे. यावर्षी हा पुरस्कार पटकावणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती ही एकमेव बँक असल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. पुढील दोन वर्षात सहकार महर्षी हा पुरस्कार बँक पटकावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अनिल जोशी, नेहा माने, गणेश लाखण, आदेश आंबोलकर, जयवंत जालगावकर, राजेंद्र सुर्वे, मधुकर टिळेकर उपस्थित होते. शासनाकडून सहकारनिष्ठ, सहकारभूषण व सहकारमहर्षी हे पुरस्कार दिले जातात. त्यापैकी २०१६ मध्ये सहकारनिष्ठ पुरस्कार यापूर्वी मिळाला आहे. सन २०१९ मध्ये सहकार भूषण पुरस्कार देऊन बँकेचा गौरव केला. राज्यात ३१ मध्यवर्ती सहकारी बँकांमधून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. बँकेचा व्यवसाय, सर्व व्यवहारापासून, सामाजिक कार्याचा विचार यात केला जातो. तब्बल ४८ निकषांची पडताळणी शासनाकडून चार टण्यात केली जात असल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ८० शाखांपैकी २२ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. पुढील पाच वर्षात उर्वरीत सर्व शाखाही स्वमालकीच्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. चोरगे यांनी सांगितले. गेल्या बारा वर्षात बँकेच्या विकासासाठीच संचालक मंडळाने प्रयत्न केले आहेत. चार विविध पक्षातील संचालक असनही, त्याचा परिणाम बँकेवर झालेला नाही. बँक हिताचेच निर्णय नेहमी घेतले जातात. निर्णयार्च अंमलबजावणी करताना अधिकारी कुचराई करीत नाही. त्यामुळेच आज ९७ टक्के कर्जाची वसुली होत आहे प्रत्येक संचालकाला तालुका देण्यात आला असल्यामुळे संचालकही कर्ज वसुलीसाठी अधिकाऱ्यांना प्रेरित करीत असल्याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले तिवरे येथे झालेल्या धरणफुटीनंतर सुमारे २० लाख रुपये खर्च करुन पार कंटेनर घरे देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here