पाटबंधारे विभागाच्या ‘इमर्जन्सी अ‍ॅक्शन प्लॅन’मध्ये जिल्ह्यातील 10 धरणांचा समावेश

0

रत्नागिरी : तिवरे (ता. चिपळूण) धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभागाने भविष्यात अशा घटनेतून मोठी जीवितहानी आणि नुकसान टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाने 10 धरणांचा ‘इमर्जन्सी अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. धरण फुटल्यास कोणत्या पातळीने पाणी जाईल, किती भाग पाण्याच्या घेर्‍यात येणार, किती घरे, गावे, बाधित होतील, किती लोकांचे स्थलांतर करावे लागणार, किती नुकसान होणार आदींचा अभ्यास या आपत्कालीन प्लॅनमध्ये केला जाणार आहे.

पाटबंधारे विभागाच्या इमर्जन्सी प्लॅनमध्ये जिल्ह्यातील 10 धरणांचा समावेश आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे; मात्र यामुळे मोठी जीवितहानी आणि नुकसान टाळता येणार आहे. तिवरे धरण फुटल्यानंतर त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये अनेक घरे, जनावरे वाहून गेली.23 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. जीवितहानी झाली. अनेक घरं, संसार उद्ध्वस्त झाली. त्यांच्या पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे; मात्र याची पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी पाटबंधारे विभागाने घेतली आहे.ज्या धरणांच्या पायथ्याशी मानवी वस्ती आहे, अशा धरणांचा अभ्यास पाटबंधारे विभाग करीत आहे. जिल्ह्यातील मोरवणे, पिंपळवाडी, पन्हाळे अशा 10 धरणांचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये धरण फुटल्यास पाण्याचा प्रवाह कोणत्या दिशेने असेल, त्याची पातळी किती असेल, या पाण्याच्या लोंढ्यात किती घरे, गावे येतील, किती लोकांचे स्थलांतर करावे लागेल, किती रस्ते पाण्याखाली जातील आदींचा अभ्यास केला जाणार आहे. या आपत्कालीन प्लॅनची एक प्रत जिल्हा प्रशासन आणि त्या-त्या तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here