फूणगुस : डिंगणी पोलिस दूरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खाडीभागात अवैद्य दारूधंदे फोफावले आहेत. अवैध सुरू असलेल्या दारू धंद्याबाबत तक्रारी केल्यानंतर अनेकदा लोकांकडून तक्रारी तसेच वृत्त पत्रातून आवाज उठवल्यानंतर या तक्रारीची दखल घेत पोलिसांकडून दखल घेऊन धाडीही टाकल्या जातात. मात्र, पुन्हा तेवढ्याच जोमाने पन्हा तेच धंदे राजरोसपणे उभारी घेत असल्याने पोलिसांच्या धाडी व कारवाईबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण होत नसल्याचेच नव्हे तर खुलेआमपणे चर्चेलाच उधाण येत आहे. डिंगणी पोलिस कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खाडीभागातील गावात राजरोसपणे दारू धंदे सुरु असून,अनेक युवा पिढी दारूच्या आहारी गेल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागले असून दारू साठी घरातील मौल्यवान वस्तू भांडीकुंडी विकून वभुरट्या चोऱ्याही काहींकडून केल्या जात आहेत. अनेक कुटूंबातील कर्तेपुरुष दारूच्या अधीन झाल्याने त्या कुटुंबाची जबादारी महिलांवर येऊन त्यांना मोलमजूर करावी लागत असतानाचशालेय शिक्षण घेण्याच्या वयात काही मुलांमुलींना अर्धवट शिक्षण सोडून त्यांच्यावर घरकाम करण्याची वेळ आली असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.राजरोस सुरू असलेल्या दारू धंद्याबाबत तक्रारी केल्यानंतर याची दखल घेत पोलिस येतात धाडी टाकतात कारवाईही करतात. मात्र, दोन दिवसानंतर पुन्हा तेवढ्याच जोमाने दारू धंदे सुरू होतात.
