दापोली : जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी सुरू असलेला शिक्षकांचा संप कायम आहे. गणपती सुट्टीनंतर देखील काळ्या फिती लावून शिक्षकांचे आंदोलन सुरूच आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमदत संपाचा इशारा देण्यात आला ओह. राज्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीने पुकारलेला एक दिवसाचा लाक्षणिक संप सुरू असून गणपतीसुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने तालुक्यातील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार सुरेश खोपकर यांना देण्यात आले. प्राथमिक शिक्षक समितीच्या दापोली शाखेच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शिक्षक समितीचे सरचिटणीस जावेद शेख, नरेंद्र जाधव, पंकज वानखडे, रोहित कदम व इतर शिक्षक उपस्थित होते.
