बांदा तपासणी नाका ठेकेदाराला 350 कोटींचा दंड

0

बांदा : बांदा-सटमटवाडी  येथील बनत असलेल्या विवादित तपासणी नाक्याच्या परिसरात बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला 349 कोटी 70 लाख इतका जबर दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. तशा प्रकारची नोटीस  मंगळवारी संबंधिताला बजावण्यात आली असून, 15 दिवसांत ही रक्‍कम भरण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. याबाबतची तक्रार बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी केली होती. बांदा तपासणी नाका परिसरात संबंधित ठेकेदार कंपनीकडून अनधिकृत उत्खनन करण्यात आले होते. त्या उत्खननाचा आकडा 2 लाख 13 हजार ब्रास एवढा होता. त्याच्या पलीकडे चुकीच्या पद्धतीने बांधकाम करण्यात आल्याचा कल्याणकर यांचा आरोप होता. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी तक्रारीद्वारे केली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीनंतर संबंधित ठेकेदार कंपनीला तहसीदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, सदर बेकायदा उत्खननाबाबत ठेकेदाराने कोणताही लेखी खुलासा मुदतीत सादर केलेला नाही. तसेच उत्खननासाठी आवश्यक कोणतीही परवानगी तत्सम अधिकृत अधिकार्‍यांकडून घेतलेली नाही. त्यामुळे तहसीलदार म्हात्रे यांनी ठेकेदाराला 348 कोटी 70 लाखांचा दंड ठोठावत 15 दिवसांत ही रक्‍कम भरणा कराण्याचे आदेश दिले आहेत.  

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here