शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांचे ना. उदय सामंत यांच्याकडून सांत्वन

0

कोल्हापूर : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेवून सांत्वन केले व दिलासा दिला. सामंत म्हणाले, जोंधळे कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेले आहे. बहिरेवाडीसारख्या छोट्याशा गावातील ऋषीकेश यांच्यासारखा एक उदयोन्मुख राष्ट्रीय खेळाडू व जवानाला भारतमातेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. ऐन दिवाळीत एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे जोंधळे कुटुंबीयांवर आकाश कोसळले असून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. ऋषीकेश यांची बहीण कल्याणी हिने शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यास तिला शहीद स्फुर्ती केंद्रामार्फत मोफत सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयामार्फत शहीद जवान ऋषीकेश यांची बहीण कल्याणी हिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच भविष्यात तिला याच संस्थेमध्ये नोकरीही दिली जाईल, असे पत्र मंत्री सामंत यांनी सुपूर्त केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शिवाजी विद्यापीठोच उप कुलसचिव विलास नांदिवडेकर, विजय देवणे, मुरलीधर जाधव, गडहिंग्लजचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयचे अध्यक्ष रिआजभाई समंजी, बहिरेवाडीचे सरपंच अनिल चव्हाण, उप सरपंच सुरेश खोत यांच्यासह नातेवाई व गावकरी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here