पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात 2 महिला पदाधिकाऱ्यांचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पर्वती मतदारसंघातल्या दोन महिला पदाधिकारी चंद्रकांत पाटलांना भेटाण्यासाठी उभ्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकीचा पदर ओढण्याचा प्रयत्न केला तर दुसरीला चिमटा काढला. गर्दीत हे कृत्य कोणी केलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. घडलेला प्रकार त्यांनी तिथे उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन दिला. मात्र इथे पत्रकार आहेत, उगीच विषय वाढेल. पक्षाची बदनामी होईल, असं सांगून घडल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्यात आलं.दरम्यान, व्हाॅटस् अप ग्रुपवर संताप व्यक्त केल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.
