भाजपच्या राज्य उपाध्यक्ष खासदार भारती पवार यांनी घेतले गणपतीपुळे ‘श्रीं’चे दर्शन

0

रत्नागिरी : भाजपच्या राज्य उपाध्यक्ष आणि खासदार डॉ. भारतीताई पवार यांनी जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे दर्शन घेतले. खासदार डॉ. पवार प्रथमच रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आज दुपारी गणपतीपुळे येथे दर्शन घेतले. भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस बाबू सुर्वे, सौ. प्राजक्ता रुमडे, सौ. शिल्पा मराठे, श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, अमेय धोपटकर, मालगुंडचे सचिन दुर्गवली, अभिजित घनवटकर आदी सर्व उपस्थित होते. उपाध्यक्ष असणार्‍या डॉ. पवार यांनी भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी चर्चा केली. तसेच प्रामुख्याने मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर व्हावे याबाबत निवेदन जिल्हाध्यक्षांनी दिले. संगमेश्‍वर बाजारपेठेतील लोकांची रस्त्याबाबतची मागणी याबाबत चर्चा केली. याबाबत जातीने लक्ष घालू, अशी ग्वाही डॉ. भारतीताई पवार यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड. पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:52 PM 19-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here