शाळा सुरु होण्यापूर्वीच पुणे महापालिकेच्या शाळेत कोरोनाग्रस्त शिक्षक आढळला

0

पुणे : दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र, महापालिकेच्या एका शाळेतील एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे शाळा सुरु होण्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. पुणे महापालिकेच्या शाळेत माध्यमिक विभागाचे एकूण 230 शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यात अजून काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर शाळा बंदच ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:06 AM 20-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here