डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या उच्च स्तरीय समितीवर नियुक्ती

0

रत्नागिरी : डॉ. आनंद आंबेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या “बोर्ड ऑफ स्टूडेंट डेव्हलपमेंट” समितीवर सलग चौथ्या वर्षी नियुक्ती झाली. वर्षभराच्या कार्यक्रम नियोजन संदर्भात मा. कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या समवेत ऑनलाईन सभा संपन्न झाली. कोविड काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. सुनील पाटील, संचालक विद्यार्थी कल्याण विभाग यांनी युथ फेस्टिव्हल, अविष्कार संशोधन फेस्टिव्हल, विद्यार्थी संसद, विद्यार्थी फेल्फेअर कार्यक्रमांचे बजेट मांडून चर्चा करण्यात आली आणि ठराव मंजूर करण्यात आले. या समितीवर नियुक्ती होणारे रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. आनंद आंबेकर हे एकमेव सदस्य आहेत. विद्यापिठाच्या उच्च स्तरावर नियुक्ती झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री सतीश शेवडे तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. आनंद आंबेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:25 PM 20-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here