ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 3 हजार 886 घरकुलांना मंजुरी देणार : हसन मुश्रिफ

0

मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय आवास दिवसानिमित्त ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 4 हजार घरकुलांना मंजुरी देणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. या योजनेसाठी जवळपास ७५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजना इतर योजनांच्या अंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे.
राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील सर्वसाधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार निधी घरकुलांना दिला जाणार आहे. तर ,नक्षलग्रस्त भागात 1 लाख 30 हजार दिले जाणार आहेत. मनरेगाच्या माध्यमातून आणखी रोजगार म्हणून 18 हजार आणि शौचालय अनुदानासाठी 12 हजारांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. महाराष्ट्र राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्यातर्फे योजना राबवण्यात येत आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 कालावधीत ‘महा आवास अभियान-ग्रामीण’चे आयोजन करण्यात आले आहे. केद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्याला 16 लाख 25 हजार 615 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्य सरकार महा आवास ग्रामीण अभियान-ग्रामीण योजेनेंतर्गत 5 लाख 3 हजार 886 घरकुलांना मंजुरी देणार आहे. यापूर्वी 11 लाख 21 हजार 729 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुलांचे बांधकाम वेळेवर होण्यासाठी 33 हजार गवंड्यांना प्रशिक्षण व साहित्य संच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 20-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here