राजापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा आदित्य ठाकरेंच्याजन आशिर्वाद यात्रेला तुफान प्रतिसाद

0

प्रतिनिधी/राजापूर दि.१६: युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडला. त्यावेळी राजापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी आ.राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचे मतदार संघाची हद्द टाकेवाडी मधुबन हॉटेल येथून लेझीम व ढोलताशाच्या गजरामध्ये जागी स्वागत केले. त्यावेळी युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांनी शाळकरी मुलांच्या लेझीम पथक व ढोल पथकांन समवेत फोटो काढले. तसेच टाकेवाडी मधुबन हॉटेल ते लांजा तालुका येथील खानु – मठ पर्यंत राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा स्वागत कमान्या, बॅनर,होर्डिंग व झेंडे लावल्यामुळे मतदार संघामध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच अनेक ठिकाणी जन आशिर्वाद यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थ उपस्थित होते.

राजापूर तालुक्यातील ओणी येथील गजानन मंगल कार्यालया समोर ढोल पथकांनच्या गजरामध्ये जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत करण्यात आले .स्वागत सभेसाठी आलेल्या जनसमुदाय पाहून आदित्यजी प्रचंड खुश झाले त्याप्रसंगी बोलताना आदित्यजी ठाकरे साहेब म्हणाले हे जनतेचे प्रेम पाहण्यासाठी मी तळकोकणात आलोय आज मी कोणाच्याही प्रचार साठी आलो नसुन मी आलोय ते झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मिळवून दिलेल्या यशा बद्दल जनआशीर्वाद घेण्यासाठी मला तुमचा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचाय मला तुमची साथ पाहीजेय त्यावेळी जमलेल्या प्रचंड जन समूदायने हात वर करून साथ देण्याचे वचन दिले. तसेच त्यांनी आ.राजन साळवी यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.सभेदरमान्य शालेय विद्यार्थी हितगुज करण्यासाठी उपस्थित होते ,विद्यार्थी मित्रांनी सेल्फी साठी आग्रह करताच गाडीमधून पुन्हा खाली येऊन सेल्फी फोटोग्राफी केली व विद्यार्थी मित्रांची मने जिंकली

तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध होण्यासाठी राजापूर तालुक्यातील बारसू , सोलगाव, गोवळ, शिवणे परिसरातील जमिनीवर प्रदूषण विरहीत औद्यागिक वसाहत उभारण्याची मागणी आमदार राजन साळवी यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करून पाठपुरावा सुरु होता. या पार्शभूमीवर जन आशिर्वाद यात्रेतील भाषणामध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बारसू,सोलगाव,येथील औद्योगिक प्रकल्पासाठी आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु असल्याचा खुलासा केला. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जन आशिर्वाद यात्रेमध्ये शिवसेना नेते उद्योग मंत्री मा. ना सुभाषजी देसाई, शिवसेना सचिव खासदार विनायकजी राऊत, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री मा. ना रवींद्रजी वायकर, आमदार सचिनभाऊ अहिर, उप नेते विजय कदम, लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी महाडिक, आमदार राजनजी साळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपाताई साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा महिला आघाडी वेदाताई फडके, जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, उप जिल्हा महिला आघाडी दुर्वाताई तावडे, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, राजापूर तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, लांजा तालुका युवाधिकारी धनंजय गांधी, राजापूर तालुका युवाधिकारी प्रफुल्ल लांजेकर सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर तसेच शालेय विद्यार्थीसह प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here