गोवळकोट येथील सदनिका फोडून चोरट्याने दीड लाखांचे दागिने लांबविले

0

चिपळूण : तालुक्यातील गोवळकोट रस्त्यावरील आफरीन पार्क येथील सदनिका फोडून अज्ञात चोरट्याने 1 लाख 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत निजाम हुसेन पटाईत (47, राआफरीन पार्क चिपळूण ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून अज्ञाताने हॉलमधील फ्रिजवरील चावीने कपाट उघडून लॉकरमधील सोन्याचे दागिने चोरले. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 21-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here