गणेशमुर्तींना राज्‍यासह परदेशातूनही मोठी मागणी

0

पेन :  शाडूच्या सुबक आणि आकर्षक मुर्तींसाठी पेण शहराची खास ओळख आहे. या ठिकाणी तयार झालेल्‍या मुर्तींतील बारकावे, सुबकता आणि डोळ्यातील बोलके भाव यामुळे पेणमध्ये तयार होणार्‍या गणेशमुर्तींना राज्‍यासह परदेशातूनही मोठी मागणी असते. पेणमध्ये तयार होणार्‍या गणेश मुर्ती पाहता, येथील कलाकारांचे विशेष कसब असल्‍याचे दिसून येते. मुर्तीमध्ये केलेली रंगसंगती, डोळयांती जीवंत भाव, कोरीव नक्षीकाम आणि विविध स्‍वरूपातील रेखीव मुर्ती ही पेणची ओळख आहे. यामुळे गणेशभक्तांकडून पेणमध्ये बनवलेल्या मूर्तींना मोठी मागणी असते. अनेक वर्षांपासून पेण हे महाराष्‍ट्रातील मुर्तीकलेचे माहेरघर म्‍हणून ओळखले जाऊ लागले आहे. पेणच्या कलाकरांमधील या कौशल्‍यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणच्या मुर्तींची मागणी वाढतच चालली आहे. दरवर्षी जवळपास १२ लाख गणेशमुर्ती पेण तालुक्‍यामध्ये घडतात. यावर्षी 2 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. गणेशोत्‍सव अवघ्‍या महिन्यावर आल्‍याने पेणमध्ये मुर्तीकामाने वेग घेतला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रासह परदेशातूनही मोठी मागणी असल्‍याने रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातून गणेश मुर्ती रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील महिन्याभरात रायगड जिल्ह्यासह ठाणे, पुणे, नाशिक, मुंबई, जिल्ह्यात गणेशमूर्ती रवाना होणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here