याच आठवड्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता

0

नवी दिल्ली : निवडणूक आयोग या आठवड्यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक मंगळवारी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या पथकात मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांचा समावेश असणार आहे. आढावा घेतल्यानंतर निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 12 सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणामधील निवडणुकांबाबत महत्वाची बैठक बोलावली. यावेळी बैठकीत मतदार यादी आणि निवडणुकीच्या इतर प्रशासकीय तयारीविषयी निवडणूक आयोगाने चर्चा केली होती. आयोगाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेचे काउंटडाऊन सुरू झाल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यातील राजकीय पक्षांनीही आपली तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, दुस-या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्यात १२५-१२५ जागा लढवणार आहेत. तर, उर्वरित ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here