आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची रामराजे महाविद्यालयाला सदिच्छा भेट

0

दापोली : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रामराजे महाविद्यालयाला सदिच्छा भेट दिली व ग्रामीण भागात इतके चांगले कार्य करीत आहात म्हणून संस्थेचे श्री. व सौ.राजपुरे व संचालक यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच कोरोना काळात नर्सिंग विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचे अभिनंदन करत विशेष शुभेच्छा दिल्या. गेले दोन ते तीन दिवस आरोग्य मंत्री दापोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रविवारी येथील विविध संस्थांना भेटी दिल्या यामध्ये दापोली अर्बन बँक, श्री गोपालकृष्ण पतसंस्था, रामराजे महाविद्यालय या संस्थांचा समावेश होता. सोबत माजी आमदार संजयराव कदम, बाबाजी जाधव, डाॅ. शैलजा जोशी, चेतन जैन, सौ.वेदीका राणे, कुणाल मंडलिक, जालिंदर पाटील, शेखर पाटील, व इतर प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:49 PM 23-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here