शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे

0

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:47 AM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here