रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रौढास दुचाकीची धडक

0

चिपळूण : तालुक्यातील मेहता पेट्रोपंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रौढास दुचाकीने पाठीमागून धडक देत अपघात केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी घडली असून तक्रार सोमवारी देण्यात आली आहे. गंगाराम नथुराम गवाणकर (45,रा.फणसोप सडा,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 10 नोव्हेंबर रोजी ते औदुंबर ट्रॅव्हल्सने रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करत होते. मार्कंडी येथे ट्रॅव्हल्स प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. तेव्हा गवाणकर लघुशंकेसाठी गाडीतून बाहेर पडले. तेव्हा बहादुरशेख नाका येथून येणार्‍या अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना पाठीमागून धडक देत अपघात केला. यात गवाणकर यांच्या उजव्या डोळ्याला, हनुवटीला, उजव्या पायाच्या टाचेला, डाव्या पायाच्या बोटांना दुखापत झाली. अधिक तपास चिपळूण पोलिस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:26 PM 24-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here