राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी सदाभाऊ खोत यांनी झहीर खान, मकरंद अनासपुरेंसह सुचवली ‘ही’ १२ नावं

0

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज राज्यपालांची भेट घेतली आहे. राज्यपालांची भेट घेत सदाभाऊ खोतांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी दिली आहे. रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचवण्यात आलेली असून, तसे पत्र राज्यपालांना दिल्याचंही सदाभाऊ खोतांनी सांगितलं आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर सदाभाऊ खोतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांची नावं सदाभाऊ खोतांकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी सुचवण्यात आली आहेत. सदाभाऊ खोतांनी राज्यपालांची भेट घेऊन ही नावं सुचवल्यानं महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी राज्यपालांकडे इतरही मागण्या केल्या आहेत. वाढीव वीजबील माफी द्यावी, ओला दुष्काळ आणि अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी, कोविडमध्ये अत्यावश्यक सेवेदरम्यान मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबांना 50 लाखांची मदत करावी, अशा आशयाच्या मागण्या त्यांनी केल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:24 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here