वर्षभरात राज्यात १५९ बिबट्यांचा मृत्यू

0

मुंबई : जानेवारी ते नोव्हेंबर या काळात राज्यातील तब्बल १५९ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ वर्षामधील ही सर्वात मोठी संख्या असल्याचे वनविभागाने सादर केलेल्या अहवालात समोर आले आहे. तसेच या वर्षी बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सर्वाधिक मानवी मृत्यूची नोंद देखील झाली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितिन काकोडकर यांनी यावर्षीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार यावर्षी झालेल्या १५९ मृत्यूंपैकी ८० बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. तर ६४ बिबट्यांचा रस्ता आणि रेल्वे मार्ग ओलांडताना मृत्यू झाला आहे. इतर मृत्यू हे आपसातील शिकारी दरम्यान झाले आहेत. दोन बिबट्यांची शिकार करण्यात आला होती. या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:42 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here