झहीर खान होणार आमदार ?

0

आजपर्यंत अनेक क्रीडापटू राजकारणात उतरले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचीही उदाहरणे आहेत. अगदी सचिन तेंडुलकरनेही खासदारकी सांभाळली आहे. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला आमदारकी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावं सुचवली आहेत. यात त्यांनी दिग्गज गोलंदाज झहीरचेही नाव सुचवले आहे. सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना रयत क्रांती संघटनेतर्फे विनंती केली आहे की राज्यात अनेक नामवंत आहेत, ज्यांना आजपर्यंत कोठेही संधी मिळालेली नाही. पण त्यांचे आपल्या आपल्या क्षेत्रात काम सुरु आहे. अशा नामवंताना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यात यावे.

झहीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९२ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ३११ विकेट्स, २०० वनडे सामन्यात २८२ विकेट्स आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.तसेच तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स(दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये १०० सामने खेळताना १०२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो सध्या मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:51 PM 25-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here