जागेचा विषय असल्याने कोरोनाचे कारण देत रनप च्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यास पत्रकारांना परवानगी नाकारली

0

रत्नागिरी : आलीमवाडी येथील पाण्याच्या टाकीसाठी 1 कोटी 27 लाख रुपये मोजून खरेदी करण्यात येणाऱ्या जागेच्या विषया साठी बोलावण्यात आलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या महत्वपूर्ण सभेत पत्रकारांना मज्जाव करण्यात आला. कोरोनाचे कारण पुढे करीत हा मज्जाव करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रत्येक सभेला यापूर्वी उपस्थित राहून पत्रकार आपले वार्तांकन करत होते. यामुळेच नगरपालिकेच्या सभेतील सर्व विषय नागरिकांना कळत होते. आज मात्र सभेला बसण्यास पत्रकारांना परवानगी नाकारल्याने कुठेतरी पाणी मुरतय की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी पत्रकार परिषदेने नगरपालिकेच्या या निर्णयावर निषेध नोंदवला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
11:28 AM 26-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here