पी. व्ही. सिंधूचे लक्ष्य ऑलिम्पिक तयारीकडे

0

चांग्झू (चीन) : जागतिक चॅम्पियन पी. व्ही. सिंधू आज (मंगळवार) पासून सुरू होणार्‍या चीन ओपन जागतिक टूर सुपर – 1000 स्पर्धेत सहभाग नोंदवणार असून, त्यावेळी तिच्या नजरा जेतेपदासह ऑलिम्पिकच्या तयारीकडे असणार आहेत. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने गेल्या महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेल येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. चीन ओपनच्या 2016 च्या सत्राची विजेती असलेली 24 वर्षीय सिंधू चीनच्या ली शुरुईविरुद्ध स्पर्धेला सुरुवात करेल. सिंधूने 2012 साली शुरुईला पराभूत करीत सर्वांचे लक्ष वेधले होते. चीनने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या या खेळाडूने शुरुईने सिंधूविरुद्ध सहा पैकी तीन सामने जिंकले आहेत व तीन सामन्यांत ती पराभूत झाली आहे. सिंधूने पहिल्या फेरीत विजय मिळवल्यास तिची गाठ कॅनडाच्या मिशेल लीशी होऊ शकते. सिंधूने या फेरीतदेखील विजय मिळवला. तर, सिंधूची गाठ उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या तिसर्‍या मानांकित व ऑल इंग्लंड चॅम्पियन चेन युफेईशी होऊ शकतो. यावर्षी इडोनेशिया मास्टर्स किताब जिंकणार्‍या जगातील आठव्या स्थानी असलेल्या सायना नेहवालचा प्रयत्न चांगल्या कामगिरीचा असेल. पहिल्या फेरीत सायनासमोर थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचे आव्हान असणार आहे. या फेरीत विजय मिळवल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीन तैपेईच्या ताई जु यिंगशी होऊ शकतो. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय यांनी माघार घेतली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान श्रीकांतची गुडघ्याची दुखापत पुन्हा एकदा बळावली आहे. तर, प्रणॉयला डेंग्यू झाला आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 36 वर्षांनंतर पहिल्यांदा पदक जिंकणारा भारतीय पुरुष खेळाडू बी. साई प्रणित पहिल्या फेरीत थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसेनोनचा सामना करेल. पारुपल्ली कश्यपसमोर पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लीवरडेजचे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत सात्विक व अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी व प्रणव जेरी चोपडा आव्हान उपस्थित करतील. महिला दुहेरीत अश्विनी व एन. सिक्की रेड्डी भारताचे प्रतिनिधित्व करतील. दुखापतीनंतर सात्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीत पुनरागमन करतील. पहिल्या फेरीत त्यांच्यासमोर जेसन अँथनी हो शुई व नाई याकुरा या कॅनडाच्या जोडीचे आव्हान असेल. गेल्या महिन्यात थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ सुपर 500 किताब जिंकणार्‍या चिराग शेट्टी व सात्विकसाईराज रनकीरेड्डी या भारताच्या आघाडीच्या पुरुष दुहेरी जोडीने अव्वल दहा जणांमध्ये स्थान मिळवले होते. ही सुपर 1000 स्पर्धा असून, आम्हाला क्रमवारीत देखील याचा फायदा होईल. असे चिरागने सांगितले. वर्षाच्या सुरुवातीला आम्हाला अव्वल दहा क्रमवारीत पोहोचायचे आहे. आम्ही काही स्पर्धांच्या उपांत्यपूर्व किंवा उपांत्यफेरीपर्यंत पोहोचलो तर आम्ही अव्वल पाच क्रमवारीपर्यंत पोहोचू व टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्यास आम्हाला मदत मिळेल, असे चिराग म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here