गुहागरमधील पेट्रोल पंपासाठी आमदार भास्कर जाधव प्रयत्नशील

0

गुहागर : गुहागर या तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोल पंपाची उणीव दूर करण्यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी पेट्रोल पंप आहेत. मात्र गुहागर शहरात पेट्रोल पंप नाही. ही उणीव दूर करण्यासाठी गुहागर शहर शिवसेनेने सह्यांची मोहीम राबविली होती. सह्यांचे हे निवेदन आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले. लवकरच पेट्रोल पंपासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन श्री. जाधव यांनी गुहागर शहर शिवसेनेला दिले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 26-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here