अण्णा हजारे मोदी सरकारविरोधात आंदेलन करणार

0

अहमदनगर | संसदेत विधेयक मांडून मोदी सरकारने माहिती अधिकार कायद्यात बदल केला आहे. या बदलाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांना आळा बसावा यासाठी कायद्यातील कलम ४ मध्ये एक तरतूद आहे. यामध्ये सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी, असं बंधन आहे. त्याचीकायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी आपल्या फायद्यासाठी सरकार या कायद्यात बदल करत आहे, असा आरोप अण्णा हजारेंनी केला. दरम्यान, अण्णा हजारे यांच्याशिवाय देशभरातून माहिती अधिकार कायद्यातील या बदलाला जोरदार विरोध होताना दिसत आहे. काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना याविरोधात एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here