रत्नागिरी : धोक्याच्या सूचना असणारे फलक असूनही त्याकडे पर्यटकांनी दुर्लक्ष केल्याने आजही गणपतीपुळे समुद्रात बुडण्याचे प्रकार घडत आहेत. आज सकाळी याच समुद्रात तीन पर्यटक बुडाल्याची घटना घडली असून यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हे निनही पर्यटक समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. हे तीनही जण इस्लामपूर येथील असून अंगारकी चतुर्थी निमित्त ते गणपतीपुळे येथे आले होते. तिसरा पर्यटक अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती मिळत आहे. गणपतीपुळे व कोकणच्या इतर समुद्र किनारी असणाऱ्या जीवरक्षकांच्या पगाराचा प्रश्न अजूनही कायम आहे. शासनाने यावर ठोस कारवाही करून जीवरक्षकांची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
