महा आवास अभियान – ग्रामीण कार्यशाळा संपन्न

0

◼️ अभियान अधिक प्रभावीपणे राबवा : विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

रत्नागिरी : सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी महा आवास अभियान – ग्रामीण 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात दिलेल्या मुदतीत लक्ष्य पूर्ण करा व हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवा अशा सूचना विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले. व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजित महा आवास अभियान ग्रामीण 2020 च्या विभागस्तर कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निवासी उपजिल्हधिकारी दत्ता भडकवाड, प्रकल्प संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर (जिल्हा परिषद, रत्नागिरी येथून व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे) सहाय्यक संचालक समाजकल्याण श्री. चिकणे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (सनियंत्रण) संतोष गमरे, माध्यम प्रतिनिधी आदि उपस्थित होते. विभागीय आयुक्त म्हणाले उत्तम गुणवत्तेचे घरकुल उभारण्यासाठी प्रशिक्षीत गंवडी आवश्यक आहे, त्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर नेमण्यासाठी प्रस्ताव सादर करा. डेमो हाऊस पंचायत समिती आवारात अथवा रस्त्यावरील गावांच्या ठिकाणी, वर्दळ अधिक असेल अशा ठिकाणी करा. विविध योजनांमधील प्रलंबित कामांचा जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आढावा घ्यावा. या योजेनमध्ये सामाजिक संस्थाचा सहभाग घ्यावा. अपूर्ण घरकुलांचा वेगळा आढावा घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी केल्या. घरकुलांना मंजूरी, मंजूर घरांना पहिला हप्ता, घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे, प्रलंबित घरकुल पूर्ण करणे, ग्रामीण गंवडी प्रशिक्षण, डेमो हाऊस उभारणे, आधारसिडींग पूर्ण करणे आदि या अभियानांतर्गत कामे विहित मुदतीत पूर्ण करा, अशा सूचना विभागीय आयुक्तांना यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी यावेळी अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत सर्व कामे विहीत मुदतीत पूर्ण करु असे सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 27-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here