अजित दोवाल आजपासून दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर

0

कोलोंबो : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आजपासून दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. त्रिस्तरीय सागरी सुरक्षा सहकार्य या विषयावर आयोजित केलेल्या चौथ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीत ते सहभागी होणार आहेत. श्रीलंकेचे संरक्षण सचिव आणि मालदीवचे संरक्षण मंत्री या बैठकीत सहभागी होतील. याशिवय बांगलादेश, मॉरिशस आणि सेशेल्सचे निरीक्षकही या बिठकीला उपस्थित राहणार आहेत, से श्रीलंकेच्या सुरक्षा दलाच्यावतीने सांगण्यात आले. या बैठकीमध्ये सागरी सुरक्षा, सागरी व्यवहारांविषयी जागृती, कायदेशीर उपाययोजनांमधील सुधारणा, शोध आणि बचाव प्रशिक्षण, सागरी प्रदुषण नियंत्रण, माहितीचे आदानप्रदान्, चाचेगिरी-शस्त्र आणि अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घलणे अणि घातक पदार्थांच्या तस्करीला रोखणे, हे प्रमुख मुद्दे असतील. याआधी 2011 ला मालदीव, 2013 मध्ये श्रीलंका आणि 2014 ला भारतात अशा बैठकीचे आयोजन झाले होते. हिंद महासागर प्रदेशातल्या देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक हे प्रभावी व्यासपीठ असल्याचे सिद्ध झाले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बैठकीबरोबरच डोवाल हे उच्चस्तरीय द्विपक्षीय भेटीही घेण्याची शक्‍यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:26 PM 27-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here