मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना धमकी देऊ नका. तुम्ही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत. आम्ही तुमच्या मागे लागलो तर झोप लागणार नाही’, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. संजय राऊत यांनी नुकतीच ‘सामना’ दैनिकासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना आक्रमक शब्दांत अप्रत्यक्ष इशारा दिला होता. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, मर्दाला मर्द असल्याचे सांगावे लागत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:37 AM 28-Nov-20