कणकवलीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेच्यावतीनेही केले उत्स्फूर्तपणे स्वागत

0

कणकवली : महाजनादेश यात्रेनिमित्त कणकवलीत आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेनेच्यावतीनेही उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पटवर्धन चौकात वाट पाहत उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पटवर्धन चौकात आगमन झाल्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक, मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ना.दीपक केसरकर आणि आ.वैभव नाईक यांच्याशीही हितगुज केले. विशेष म्हणजे पटवर्धन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजप नेते संदेश पारकर, अतुल रावराणे आणि भाजपचे कार्यकर्तेही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेने मात्र कुठेही बॅनर लावलेले दिसले नाहीत. शिवसेना मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार की नाही याबाबत उत्सुकता होती. अखेर शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी कणकवली येथील पटवर्धन चौकात मुख्यमंत्र्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैभव नाईक यांच्याकडे बघत ‘थम्ब’ दाखवून शुभेच्छा दिल्या. याची चर्चा या स्वागतानंतर सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here