नवी मुंबई : अगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मतदानसंघ निहाय चाचपणीला सुरुवात केली आहे. आज बुधवारी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील मोजक्या सात पदाधिका-यांना सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास मातोश्रीवर बोलावून माहिती घेण्यात आली. यावेळी प्रभागातील कामांचा आढावा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला. युती झाली तरी आणि नाही झाली तरी संभाव्य उमेदवारांनी कामाला सुरुवात करण्याचे आदेश यावेळी ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने मतदार संघ निहाय आढाव घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीला फक्त पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या मतदासंघातून मागील निवडणुकीमध्ये विजय नाहटा यांचा अवघ्या काही हजार मतांनी पराभव झाला होता. मात्र यंदा त्यांनी जोरदार तयारी सुरु केली असून शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्याने नाहटा हे पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेनेमार्फत बेलापूर विधानसभेची चाचपणी झाली असून युती झाल्यास हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी सेनेचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. या बैठकीला नगरसेवक आणि आणि इतर पदाधिकाऱ्यांना दूर ठेवून ही बैठक घेण्यात आली. जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने, उप जिल्हाप्रमुख अतुल कुलकर्णी, संतोष घोसाळकर, मिलिंद सूर्यराव, रोहिदास पाटील अशा मोजक्याच नेत्यांचा या बैठकीत समावेश होता
