मराठा क्रांती मोर्चा ८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार

0

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय निर्णायक बैठक दि. २९ नोव्हेंबरला पुणे येथे पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थी व नोकरी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना डावलून प्रवेश प्रक्रिया सुरु केल्या प्रकरणी मराठा समाज अस्वस्थ आहे. महावितरणमध्ये उमेदवारांना डावलून उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा निर्णय महावितरण ने घेतल्याने मराठा समाज येत्या १ व २ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्ह्या नुसार अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात करणार आहे. त्याच प्रमाणे येत्या ८ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन दरम्यान महाराष्ट्रभरातील मराठा समाजाकडून मुंबई येथे लॉंग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाज समन्वयकांनी बैठक संपल्यानंतर दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:45 AM 30-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here