रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेली दुचाकी लांबवली

0

रत्नागिरी : शहरातील झारणीरोड येथून दुचाकी लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज दिलीप भुवड (24, मूळ रा. संगमेश्वर, सध्या रा.झारणीरोड, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी त्यांनी आपली ऍक्टिवा दुचाकी (एमएच-08-एएम-8047) रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने लांबवली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:50 PM 30-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here