ठाकरे सरकारवर राणेंचा प्रहार : “हि उद्धवशाही नसून बेबंदशाही आहे”

0

◼️ या सरकारने ३ हजार कोटीचा भ्रष्ट्राचार कोरोनाच्या नावाखाली केला आहे : नारायण राणे

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला. ते आज रत्नागिरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली मात्र जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. मागील वर्षभरात नवीन सरकारने कोणाच्याही जीवनात परिवर्तन व्हावे असे कोणतेही काम केले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत देखील राज्याच्या विकासाबाबत आपण काय केले याचा साधा उल्लेख नाही. हे सरकार निकम्म सरकार आहे. या सरकारचा पायगुण असा आहे की हे आल्यावर कोरोना आला. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत, रुग्णांसाठी करावयाच्या उपाययोजना करण्यास हे सरकार कमी पडले. हे कर्तृत्व या मुख्यमंत्र्यांचे आहे आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला. ते म्हणाले कि आता मी हाथ धुवून मागे लागणार ते कोणाच्या ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यानी द्यावे. कर्जमाफी किती दिली ? शेतकरी आत्महत्या करतायत, देवेंद्र फडणवीस सरकारने १८ हजार कोटींची कर्जमाफी दिली. या सरकारने ३००० कोटींचा भ्रष्टाचार या कोरोनाच्या नावाखाली केला आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत, कायदा व सुवेवस्थेचा बोजवारा उडालाय, काय करतात मुख्यमंत्री ? कायदा व सुव्यवस्थेचा केवळ खेळ खंडोबा आहे. जगातील असा पहिला मुख्यमंत्री आहे की जो घरातून कारभार करतोय. खून करून आत्महत्या म्हणून दाखवण्यात येतायत. सुशांतसिंग चा देखील खून झालाय पण यांच्या राजवटीत हा खून आत्महत्या म्हणून पचावण्यात येतोय. सुडाचे राजकारण करून पत्रकारांवर केसेस होतायत. पत्रकारांना आशा पद्धतीने वागणूक देणारे महाराष्ट्रातील हे पहिले मुख्यमंत्री आहेत. वीज बिल माफ करणारे आता काही बोलत नाहीत. ही उद्धव शाही नसून ही बेबंदशाही आहे. महाराष्ट्राला उध्दवस्त करण्याचे काम करण्याचे उद्धव सरकार करतंय. जो चुकणार त्याच्यावर प्रहार करायचा हा माझा स्वभाव आहे. कारशेड कांजूरमार्ग येथे नेण्यामुळे ४ हजार कोटींची भुर्दंड पडणार आहे. रत्नागिरीतील आरोग्य सेवेसाठी दहा हजार कोटी खर्च झालेत, या जिल्ह्यला जिल्हा नियोजन साठी २११ कोटी मंजूर झाले त्यापैकी ६९ कोटी फक्त आले. यातील 34 कोटी कोरोनासाठी खर्च झालाय. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मुख्यमंत्र्यांना रत्नागिरीत कोण राहतं हे माहीत नाही काय ? मराठी माणूस रत्नागिरीत नाही काय ? आपल्याच वृत्तपत्रात मुलाखत देऊन बढाया मारणाऱ्यानी राज्याला या सहा महिन्यांत ६० हजार कोटीच्या कर्जाच्या खाईत लोटलंय असा जोरदार प्रहा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे..

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:46 PM 30/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here