रत्नागिरीतून शिवसेनेला हद्दपार केल्याशिवाय येथील विकास होणार नाही : नारायण राणे

0

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला. ते आज रत्नागिरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि रत्नागिरीच्या जनतेला माझी विनंती आहे, या जिल्ह्यातून शिवसेनेला हद्दपार करा, सेनेला हद्दपार केल्याशिवाय येथील विकास होणार नाही. भ्रष्ट्राचार या एककलमी कार्यक्रमातून मुक्ती करायची असेल भरतीय जनता पक्षाला संधी द्या असे राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला माजी खासदार निलेश राणे, बीजेपी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू व भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. बाबा परुळेकर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
04:56 PM 30/Nov/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here