चिपळुण : तालुक्यातील सावर्डे येथे देवदिवाळीनिमित्त १५ डिसेंबरला होणारी श्री देवी मरीआईची यात्रा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती श्री देव केदारनाथ उर्फ केदारबाजी वरदान देवस्थान ट्रस्टने दिली. केवळ मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत मंदिरातील धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांनी श्री देवी मरीआईच्या दर्शनासाठी, नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी भाविकांनी सावर्डे येथे न येता आपल्या घरातूनच देवीची आराधना करावी, असे आवाहन ट्रस्टी तसेच ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:07 AM 01-Dec-20