काळवीट शिकार प्रकरण : सुनावणीसाठी सलमान खान कोर्टात गैरहजर

0

जोधपूर : सलमान खान सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या प्रचंड व्यस्त आहे. पण त्याच्यावर एकेकाळी झालेल्या आरोपांमधून अजूनही त्याची सुटका झालेली नाही. काळवीट शिकारप्रकरणी आज (1 डिसेंबर) सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:36 PM 01-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here