सिंधूची ऑलिंपिक सुवर्ण जिंकणारीवर मात

0

बिजिंग : चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पहिल्याच फेरीत गारद झाली. तिला थायलंडच्या बुसानानने १०-२१ १७-२१ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. सायनाची ही थायलंडच्या बॅडमिंटनपटूकडून सलग दुसरी हार आहे. पण, भारताची दुसरी स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने माजी ऑलिंपिक सुवर्ण विजेत्या ली चा २१-१८, २१-१२ असा पराभव करत आपली स्पर्धेतील घोडदौड सुरु ठेवली आहे. लंडन ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालचा जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेल्या बुसानानने ४४ मिनिटात १०-२१, १७-२१ असा पराभव केला. २९ वर्षीय सायना नेहवालने दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी झगडावे लागत आहे. भारताने चायना ओपनमध्ये पुरुष एकेरीत प्रणीतने थायलंडच्या सुपान्युचा २१-१९, २१-२३, २१-१४ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. पुरुष दुहेरीत भारताला निराशा हाती लागली. प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांचा जर्मनीच्या मार्क लाम्सफस्स आणि इसाबेल हाट्रीच यांच्याकडून १२-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here