‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली..’; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात मनसेची पोस्टरबाजी

0

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या या दौऱ्यावर मनसेकडून खरपूस टीका करण्यात आली आहे. ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’, अशा शब्दात मनसेने योगींवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ मुंबईत वास्तव्यात असलेल्या ट्रायडेंट हॉटेलबाहेर मनसेने बॅनरबाजी केली आहे. ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली….’, ‘कुठे महाराष्ट्रचं वैभव….तर कुठे युपीचं दारिद्र्य…’ असं मनसेने या बॅनरमध्ये म्हटलं आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्नं. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ‘ठग’,’ असेही या बॅनरवर छापण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरमध्ये मनसेकडून योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांना युपीचा ठग असे म्हटलं आहे. मुंबई लुटायला आलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा इरादा हा मुंगेरीलालचे स्वप्नं असल्याचंही त्यांनी होर्डिंगमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे गणेश चुक्कल यांनी हेच होर्डिंग भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाबाहेरही लावलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 02-Dec-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here