मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सध्या भाजप सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले, मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. याविषयी बरीच उलट सुलट चर्चा होते आहे. शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपत पाठवलं, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीने सत्ता संपादन मेळाव्याचे सोलापुरात आयोजन केले होते. यावेळी अण्णाराव पाटील बोलत होते.
वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेवेळी त्याचा प्रभाव महाराष्ट्रभर दिसून आला आहे.
