नवी दिल्ली : काँग्रेस अहमद पटेल आणि गुलाम नबी आझाद यांनी आयएनएक्स मिडिया भ्रष्टाचारप्रकरणी तिहार कारागृहात असलेल्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची मंगळवारी भेट घेतली. आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची चौकशी सुरू असून सध्या त्यांची रवानगी दिल्लीतील तिहार कारागृहात करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी चिदंबर यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासबोत पी. चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरमदेखील उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. या भेटीत सुमारे अर्ध्या तासाच्या भेटीमध्ये देशाची विद्यमान राजकिय परिस्थिती, काश्मीरमधील स्थिती, आगामी विधानसभा निवडणुका आणि अर्थव्यवस्थेच्या स्थितीविषयी चर्चा झाल्याचे समजते.
