फुटपाथ झाले मोकळे, नगरपालिकेच्या कारवाईचे पादचाऱ्यांनी केले स्वागत

0

रत्नागिरी : फुटपाथवरील फेरीवाल्यांचे आणि टपऱ्यांचे अतिक्रमण हटवण्यास कालपासून नगरपालिकेने प्रारंभ केला आहे. काल सुरु करण्यात आलेली हि मोहीम आता कायम चालूच राहणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितलंय. आज आठवडा बाजार येथील अतिक्रमणे व खोके हटवण्यात आले. उद्यापासून शहरातील मुख्य बाजरपेठ असणाऱ्या राम आळी, गोखले नाका, विठ्ठल मंदिर, गाडीतळ, धनजीनाका आदी ठिकाणी कारवाई होणार आहे. कुणीही नगरसेवकाने या कारवाईत अडथळा करू नये अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत. यामुळे अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी देखील कुणालाही पाठीशी न घालता आपले काम करताना दिसत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ आता मोकळे झालेले दिसत असून नगरपालिकेच्या या कारवाईचे पादचाऱ्यांनी व नागरिकांनी स्वागत केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:37 PM 02/Dec/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here