रत्नागिरीची कन्या आकांक्षा कदम हिची कॅरम टेस्ट सिरीजसाठी भारताच्या संघात निवड

0

रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनची खेळाडु कु. आकांक्षा कदम हिची दिनांक ५ ते १२ ऑक्टोबर २०१९ रोजी होण्याऱ्या भारत मालदिव्ह कॅरम टेस्ट सिरीजसाठी भारताच्या कुमारी गटाच्या संघात निवड झाली आहे. तसेच एअरपोर्ट आथोरीटी ऑफ इंडीया स्पोर्टस कंट्रोल बोर्ड यांची २०१९.२० या वर्षाची स्कॉलरशिप पण तिला जाहीर झाली आहे. या बद्दल कु. आकांक्षा हिचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

कु. आकांक्षा कदम हिला तिच्या मामा व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडु श्री. संदीप देवरूखकर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडु श्री. अरूण केदार, शिर्के प्रशाला,रत्नागिरी येथील किडा शिक्षक विनोद मयेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कु. आकांक्षा कदम हिने केलेल्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल रत्नागिरीचे आमदार व म्हाडा अध्यक्ष श्री. उदय सामंतसाहेब, सहाद्री शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा शेखर निकमसाहेब, जिल्हापरीषद सदस्य श्री रोहन बनेसाहेब, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार श्री. सुचयअण्णा रेडीज, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रदीप भाटकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र देसाई, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव श्री. मिलिंद साप्ते यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here